‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा’
‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा’

‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा’

sakal_logo
By

चाकण, ता. २६ : शासन नियमांचे पालन करून प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करावा, त्या अनुषंगाने चाकण नगर परिषदेच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. सर्व गणेश भक्तांनी आपल्या गणेश मूर्ती नगर परिषदेने नियोजित केलेल्या मूर्ती संकलन केंद्रावरच द्याव्यात. गणेश मूर्ती संकलन केंद्रावर देण्यापूर्वी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी घरातच आरती, पूजा करण्यात यावी. गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या गणेश मूर्तीचा वापर करावा. कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढताना ध्वनी प्रदूषण टाळावे, गणेश मंडळांनी सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. पीओपीच्या मूर्ती वापरणे टाळावे, गृह रचना सोसायटी यांनी त्यांच्या सोसायटीमधील सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन सोसायटीच्या परिसरामध्येच करावे, सदर मूर्ती संकलन केंद्रावर आणून द्याव्यात, निर्माल्य नगर परिषदेच्या निर्माल्य संकलन गाडीमध्ये टाकावे, प्लॅस्टिकपासून बनवलेले देखावे टाळावेत, शासन नियमांचे पालन करून प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी मंडळे व नागरिकांना केले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Chn22b02187 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..