चाकण येथे व्याख्यानमालेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकण येथे व्याख्यानमालेचे आयोजन
चाकण येथे व्याख्यानमालेचे आयोजन

चाकण येथे व्याख्यानमालेचे आयोजन

sakal_logo
By

चाकण, ता. २८ : येथील चाकण शिक्षण मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालय चाकण, अभिमन्यू शेलार व मित्रपरिवार यांच्यावतीने योद्धा शेतकरी युगात्मक शरद जोशी वैचारिक व्याख्यानमालेचे १ ते ३ सप्टेंबर रोजी आयोजन केले असल्याची माहिती प्रा. डॉ. शिवाजी एंडाईत यांनी दिली.
चाकण (ता. खेड) येथील मीरा मंगल कार्यालयात ही व्याख्यानमाला सकाळी दहा वाजताहोणार आहे. या व्याख्यानमालेत गुरुवारी (ता. १) रोजी डॉ. संजय चाकणे, प्राचार्य टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी पुणे यांचे ‘चाकोरी बाहेरील शिक्षण’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. शुक्रवारी (ता. २) एमकेसीएल पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक सावंत यांचे ‘२१ व्या शतकात तरुणांपुढील आव्हाने व संधी’ या विषयी व्याख्यान होईल. शनिवारी (ता. ३) जनशक्ती वाचक चळवळ औरंगाबादचे प्रकाशक श्रीकांत उमरीकर, यांचे ‘कृषी कायदे सत्य आणि विपर्यास’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानमालेचे आयोजन अभिमन्यू शेलार (चेअरमन, महाशिवार ॲग्रो) डॉ. अविनाश अरगडे (संस्थापक विश्वस्त, सचिव चाकण शिक्षण मंडळ) मोतीलाल सांकला (संस्थापक, विश्वस्त चाकण शिक्षण मंडळ) यांनी केले असल्याची माहिती चाकण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश लाटणे यांनी दिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Chn22b02193 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..