जमीन पुनर्वसनासाठी का द्यायची? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जमीन पुनर्वसनासाठी का द्यायची?
जमीन पुनर्वसनासाठी का द्यायची?

जमीन पुनर्वसनासाठी का द्यायची?

sakal_logo
By

चाकण, ता.१ : भामा -आसखेड धरणाचा कालवा चाकण परिसरातून जाणार आहे. मात्र, २५ वर्षे होऊनही कालवा झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा लाभच मिळत नसल्याने लाभक्षेत्राचे शिक्के काढून टाका. कालवा होणार नसल्याने जमीन पुनर्वसनासाठी कशाला द्यायची? हा संतप्त सवाल केला असून आमच्या पुढच्या पिढ्यांना भूमिहीन करायचे का? अशी भावना रासे (ता.खेड) येथील अल्पभूधारक शेतकरी नंदकुमार मुंगसे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
भामा-आसखेड धरणाचा कालवा केवळ कागदावरच आहे. धरणाच्या लाभ क्षेत्रातील गावांच्या जमिनींच्या सातबारा उताऱ्यावरील पुनर्वसनाचे शिक्के काढून टाकण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे. धरणाच्या बुडीत क्षेत्रात जमीन गेलेल्या ३८८ शेतकऱ्यांना पर्यायी जमीन देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. धरणामुळे चौदाशे चौदा शेतकरी खातेदार बाधित झाले होते. याबाबत रासे येथील शेतकरी नामदेव मुंगसे, विठ्ठल मुंगसे, नंदकुमार मुंगसे, विलास मुंगसे, प्रकाश मुंगसे, शंकर मुंगसे यांनी सांगितले की, चाकण परिसरातील रासे या गावातील आमची जमीनही भामा -आसखेड धरणाच्या लाभ क्षेत्रात येत असल्यामुळे जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर लाभक्षेत्राचे शिक्के असल्यामुळे जमीन धरणग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे. आमची ३१ गुंठे जमीन ही धरणग्रस्तांसाठी देण्याचा प्रयत्न होत आहे. काही एजंट त्यांच्या माध्यमातून तसेच काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही धरणग्रस्त लोक जमिनीचा ताबा घेण्यासाठी येत आहेत. याला आमचा तीव्र विरोध आहे. चाकण परिसरातील मोजक्या जमिनी रस्त्यावरील जमिनी घेण्याचा काही लोकांचा डाव आहे. लाभ क्षेत्रात येत नाही त्या जमिनींना पाणी मिळत नाही. तरी त्या जमिनी घेण्याचा प्रयत्न काही अधिकारी एजंटांच्या मदतीने या जमिनी मिळविण्याचा काही धरणग्रस्त तथाकथित शेतकरी करत आहेत. या अन्यायासाठी आम्ही मुख्यमंत्र्याकडे दाद मागणार आहोत, असे बाधित शेतकऱ्यांनी सांगितले.

आमदार दिलीप मोहिते यांनीही लाभक्षेत्राचे शिक्के काढून टाकण्यात यावेत तसेच जिथे कालवा रद्द झाला आहे.तिथे जमिनीला धरणाचे अजिबात पाणी मिळत नाही. त्या गावातील जमिनी घेऊ नयेत, असे वेळोवेळी शासनाला सांगितले आहे. चाकण, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, कडाचीवाडी, रासे, काळुस या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन आम्हाला भूमिहीन करू नये, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. आम्ही आमच्या जमिनी कोणालाही ताब्यात देणार नाही.
- अप्पासाहेब कड, अध्यक्ष, शेतकरी कुणबी संघ

....................
धरणग्रस्तांच्या नावाखाली जमिनी लाटल्या
भामा आसखेड धरणाचे लाभ क्षेत्र म्हणून चाकण परिसरातील औद्योगिक वसाहतीच्या लगतच्या गावात लाभक्षेत्र म्हणून जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर शासनाचे शिक्के मारण्यात आले आहेत. ते अनेक वर्षापासून त्या सातबारा उताऱ्यावर आहे. हे शिक्के वगळले गेले नाहीत. त्यामुळे या आमची थट्टा सुरू आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या परिसरात जमिनींना सोन्याचे भाव आल्याने काही एजंट, काही प्रशासनातील अधिकारी, काही नेते, कार्यकर्ते यांनी मिळून या परिसरातील मोक्याच्या जमिनी धरणग्रस्तांच्या नावाखाली लाटल्या आहेत. त्याची चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांची मागणी आहे. यात खरा धरणग्रस्त मात्र जमीन मिळविण्यापासून लांबच राहिला आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Chn22b02205 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..