फुलांच्या पायघड्या घालून चाकणला स्त्रीजन्माचे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुलांच्या पायघड्या घालून चाकणला स्त्रीजन्माचे स्वागत
फुलांच्या पायघड्या घालून चाकणला स्त्रीजन्माचे स्वागत

फुलांच्या पायघड्या घालून चाकणला स्त्रीजन्माचे स्वागत

sakal_logo
By

चाकण, ता. ८ : ''पहिली बेटी धनाची पेटी'' या म्हणीप्रमाणे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य सचिव, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी संचालक गणेश डावरे पाटील यांची नात व समृद्धी प्रतीक डावरे पाटील यांची कन्या गौरी आवाहन या दिवशी जन्म झाला. स्त्री जन्माचे, गौरी आली अंगणी असे समजून चाकण (ता. खेड) येथे नवजात मुलीचे स्वागत फुलांच्या पायघड्या घालून आकर्षक सजावट करून करण्यात आले.

डावरे पाटील कुटुंबाची इच्छा होती की पहिली मुलगी व्हावी आणि पहिली मुलगी झाली. श्रद्धा हॉस्पिटलच्या डॉ. विद्या किशोर भोसले यांच्या प्रयत्नाने मुलीची प्रसूती व्यवस्थित झाली. यावेळी तालुक्यातील आध्यात्मिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होते. मुलीच्या जन्माचे स्वागत गौरी आवाहनाच्या दिवशी करण्यात आले. हा एक योगायोग असून प्रत्येक मुलीचे स्वागत असेच करण्यात यावे. मुलीला मुलाप्रमाणे समजण्यात यावे असे डॉक्टर विद्या भोसले, गणेश डावरे पाटील यांनी सांगितले.

03950

Web Title: Todays Latest District Marathi News Chn22b02229 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..