चाकणमध्ये बटाटा २० रुपये प्रतिकिलो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकणमध्ये बटाटा
२० रुपये प्रतिकिलो
चाकणमध्ये बटाटा २० रुपये प्रतिकिलो

चाकणमध्ये बटाटा २० रुपये प्रतिकिलो

sakal_logo
By

चाकण, ता. १० : चाकण (ता. खेड) येथील बाजारात उत्तर प्रदेश (आग्रा) व गुजरात राज्यातून शनिवारी (ता. १०) सुमारे ५०० टन बटाट्याची आवक झाली, अशी माहिती खेड बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांनी दिली.
चाकण येथील महात्मा फुले बाजार राज्यात कांदा व बटाट्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील बाजारात साधारणपणे शीतगृहात साठवलेल्या बटाट्याची मोठ्या प्रमाणात आवक होते व विक्री होते. यावर्षीच्या पावसाळी हंगामातील बटाटा येण्यास एक महिन्याचा उशीर होणार असल्याने सध्या उत्तर प्रदेशातील आग्रा बटाट्याला व गुजरात राज्यातील बटाट्याला मोठी मागणी आहे. हा बटाटा खरेदी करण्यासाठी पुणे जिल्ह्यातून तसेच कोकण, पिंपरी-चिंचवड, मुंबई या परिसरातून विक्रेते मोठ्या प्रमाणात येतात. उत्तर प्रदेशातील आग्रा बटाटा हा गोड नसल्याने त्याला हॉटेल व्यवसायिकांची, वडापाव बनवणाऱ्यांची मोठी मागणी राहते. त्यामुळे या बटाट्याची विक्री मोठी होते, असे व्यापारी अकबरभाई काझी यांनी सांगितले.
सध्या बाजारात २० रुपये प्रति किलोने बटाटा विकला जात आहे. परराज्यातील बटाट्याचे भाव सध्या वाढले आहेत. त्यामुळे परराज्यातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे, असे शेतकरी बाबा पवार व नवनाथ चौधरी यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Chn22b02236 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..