चाकण-तळेगाव मार्गावर तळ्याचे स्वरूप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकण-तळेगाव मार्गावर तळ्याचे स्वरूप
चाकण-तळेगाव मार्गावर तळ्याचे स्वरूप

चाकण-तळेगाव मार्गावर तळ्याचे स्वरूप

sakal_logo
By

चाकण-तळेगाव मार्गावर तळ्याचे स्वरूप
वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण; उपाययोजनांची मागणी

चाकण, ता. १४ ः येथील राणूबाई मळ्यात चाकण-तळेगाव राज्य मार्गावर गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने मार्गाला तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यातून दुचाकी व इतर वाहने कशी चालवायची हा प्रश्न वाहनचालकांना पडतो आहे. या मार्गावर पाण्याचे तळे साचल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली असून, योग्य त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

चाकण -तळेगाव राज्य मार्गावर औद्योगिक वसाहतीत लॉरियल कंपनीजवळ, तसेच कला जनसेट कंपनीसमोर मोठे खड्डे पडले आहेत. त्यात पाणी साचल्याने तळे साचले आहे. पावसाच्या साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्याने काही लोकांच्या घरात पाणी शिरते आहे. वाढलेल्या अतिक्रमणांमुळे पाणी जाण्यासाठी जागा राहिलेली नाही. शेजारील ओढेही काही लोकांनी बुजविले आहेत. संबंधित विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप नागरिकांचा आहे.

मार्गावर पाणी अगदी गुडघाभर साचले असल्याने पादचारी, विद्यार्थ्यांना मात्र हाल सोसावे लागत आहे. पाण्यामुळे वाहतूक मंद होते. त्यामुळे वाहनाच्या रांगा लागून वाहतूक कोंडी होते. या मार्गाचे काम मात्र लालफितीत अडकले आहे, ते लवकर मार्गी लागावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
---------------------

Web Title: Todays Latest District Marathi News Chn22b02244 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..