कचरा टाकणाऱ्यांना उठाबशीची शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचरा टाकणाऱ्यांना उठाबशीची शिक्षा
कचरा टाकणाऱ्यांना उठाबशीची शिक्षा

कचरा टाकणाऱ्यांना उठाबशीची शिक्षा

sakal_logo
By

चाकण, ता. १४ : मेदनकरवाडी (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीतर्फे पुणे-नाशिक महामार्गावर बालाजीनगर जवळील रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्यांविरोधात तीव्र मोहीम राबवण्यात येत आहे. कचरा टाकणाऱ्या बेजबाबदार भाडेकरूंकडून तसेच घर मालकांकडून दंडाची रक्कम वसूल केली जात आहे.

मेदनकरवाडीची लोकसंख्या सुमारे दीड लाख आहे. गावचे हद्दीत मोठ्या प्रमाणात कंपन्या असल्याने तसेच चाकण औद्योगिक वसाहतीजवळ असल्याने कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात राहण्यास आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे हद्दीत मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. मेदनकरवाडीतील बालाजीनगर व परिसरातील कचरा अगदी पुणे- नाशिक महामार्गाच्या बाजूला टाकला जातो. हा कचरा भाडेकरू तसेच काही घरमालक रात्रीच्या वेळी तसेच पहाटेच्या वेळी टाकतात. काहीजण दुचाकीवर येऊन कचरा टाकतात. काहीजण पायी येऊन टाकतात तर काहीजण चार चाकी वाहनातून येऊन हा कचरा टाकतात.


पुणे-नाशिक महामार्गाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत. तसेच दुर्गंधी पसरली आहे. कचरा टाकणाऱ्यांविरोधात राबविण्यात येणाऱ्या मोहिमे अंतर्गत कचरा टाकणाऱ्यास उठा बशीकाढण्याची शिक्षा देऊन समज दिली जाते. तसेच त्यांच्यावर दंड आकारून घरमालकांकडूनही दंड आकारण्याचे ग्रामपंचायतीने ठरविले आहे. त्यानुसार काही जणांवर कारवाई केलेली आहे.
- राजाराम रणपिसे, ग्रामविकास अधिकारी


पुणे-नाशिक महामार्गाच्या बाजूला कचऱ्याचे ढीग पसरले आहेत. तो ग्रामपंचायतीला उचलावा लागतो. ढिगामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायत नेहमी प्रयत्न करते परंतु काही लोक जाणून बुजून रात्रीच्या वेळी, पहाटेच्या वेळी कचरा टाकतात. जे कचरा टाकतात त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने मी स्वतः तसेच कर्मचारी, सदस्य त्या लोकांना पकडत आहोत व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच विरोध करणाऱ्यांची नावे पोलिस अधिकाऱ्यांना दिली जात आहेत.
- अमोल साळवे, सरपंच (ता.खेड)

.....
03977

Web Title: Todays Latest District Marathi News Chn22b02246 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..