करवाढीविरोधात चाकण ग्रामस्थ आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करवाढीविरोधात चाकण ग्रामस्थ आक्रमक
करवाढीविरोधात चाकण ग्रामस्थ आक्रमक

करवाढीविरोधात चाकण ग्रामस्थ आक्रमक

sakal_logo
By

चाकण, ता. २४ : चाकण (ता. खेड) नगर परिषदेच्या वाढीव दराने मालमत्ता कर लागू करण्याला सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी बैठक घेऊन विरोध केला. प्रशासन आणि शासनाने तत्काळ करवाढ कमी करण्याबाबत निर्णय न घेतल्यास आंदोलन आणि कायदेशीर लढा देण्याचा निर्धार यावेळी केला.
सर्वेक्षणात अनेक चुका असताना करवाढ लादण्याचा प्रयत्न होत आह. चाकण शहराच्या याच करवाढीच्या संदर्भात सर्वपक्षीयांनी काही दिवसांपूर्वी प्रशासनाकडे हरकती घेऊन आणि निवेदन देऊन सदरील करवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. याबाबतच्या सर्वेक्षणात अनेक चुका आहेत. नागरिकांवर करवाढ लादण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप सर्वपक्षीयांनी बैठकीत केला. ग्रामपंचायतीतून थेट ‘ब’ वर्ग नगरपरिषद स्थापन झाली. प्रत्यक्षात प्रथम नगरपंचायत त्यानंतर ‘क’ वर्ग व नंतर ‘ब’ व ‘अ’ होणे अपेक्षित होते. मात्र, चाकण थेट ‘ब’ वर्ग नगरपरिषद झाल्याने त्याप्रमाणे होणारी कर आकारणी अन्यायकारक आहे. नागरिक म्हणून त्यात चाकणकरांचा काहीही दोष नसताना भरमसाट करआकारणी कशासाठी? असा सवाल यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, बाजार समितीचे संचालक राम गोरे, माजी उपसरपंच अशोक बिरदवडे, कालिदास वाडेकर, कुमार गोरे, ॲड. नीलेश कड पाटील, बाळासाहेब गायकवाड आदींनी उपस्थित केला.
यावेळी संजय गोरे, लक्ष्मण वाघ, संदीप परदेशी, नवनाथ शेवकरी, अस्लमभाई सिकीलकर, सरफराज सिकीलकर, समीर सिकीलकर, प्रकाश भुजबळ, मूबीनभाई काजी, अक्षय जाधव, अतुल गोरे, अशोक जाधव, मनोहर वाडेकर, आदींसह चाकण विकास मंच व करवाढ कृती समितीचे सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.

नागरिकांमध्ये संभ्रम
करवाढीच्या नोटीस प्रशासकाच्या काळात दिल्या आहेत. सर्वेक्षणासाठी एजन्सी नियुक्त करणे, मालमत्तांचे सदोष सर्वेक्षण करणे आदी सर्व प्रक्रिया नगरपरिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या कार्यकाळातच पूर्ण झाल्या आहेत. यापूर्वी स्थायी समितीने कर रचनेबाबत ठराव केल्याने नेमके कर किती राहणार, याबाबत नागरिकांत मात्र संभ्रम आहे.

ग्रामपंचायतीतून नगरपरिषद अस्तित्वात आलेली आहे. ‘ब’ वर्ग नगरपरिषद आहे. ग्रामपंचायतचे कर कमी होते, परंतु नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर नगर परिषदेची कर रचना ही वेगळी आहे. कर कमीत कमी २३ टक्क्यांनी वाढलेले आहेत. करवाढीबाबत सुमारे ३२०० लोकांनी अपील केलेले आहे. त्याबाबत सुनावण्या येत्या २६, २७ तारखेला होणार आहेत. चाकण नगर परिषदेच्या हद्दीत २६ हजार मालमत्ताधारक आहेत. फक्त तेरा हजार मालमत्ता धारक नोंदविण्यात आले होते. आता अजून तेरा हजार मालमत्ताधारक नोंदविले गेले आहेत. अर्जावर सुनावण्या झाल्यानंतर ज्यांना निर्णय मान्य नसतील, ते न्यायालयातही जाऊ शकतात.
- सुनील बल्लाळ, मुख्याधिकारी, चाकण नगरपरिषद

Web Title: Todays Latest District Marathi News Chn22b02264 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..