चाकणध्ये कोथिंबीरीला उच्चांकी भाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकणध्ये कोथिंबीरीला उच्चांकी भाव
चाकणध्ये कोथिंबीरीला उच्चांकी भाव

चाकणध्ये कोथिंबीरीला उच्चांकी भाव

sakal_logo
By

चाकण, ता. १ : राज्यात पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने पावसाने शेती पिके तसेच कोथिंबीर, मेथीच्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. कोथिंबिरीची पीक मोठ्या
प्रमाणात गेली. शेतात पाणी साचल्याने व सातत्याने पाऊस राहिल्याने कोथिंबिरी सडली आहे. त्यामुळे मोजक्याच शेतकऱ्यांचे कोथिंबिरीचे पीक शिल्लक राहिले. यामुळे
चाकण (ता. खेड) येथील महात्मा फुले बाजारात एका जुडीला अगदी पन्नास, शंभर, दीडशे रुपये असा भाव मिळत आहे.
चाकणच्या बाजारात पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, कोकण या भागातून शेतीमालाची खरेदी करण्यासाठी खरेदीदार येतात. पावसाने उघडीप न दिल्याने शेतातील कोथिंबिरीचे पीक मोठ्या प्रमाणात सडले गेले. त्याचा फटका कोथिंबिरीच्या पिकाला बसला. सध्या कोथिंबीरीला दहा ते पंधरा हजार रुपये भाव मिळत आहे. नाशिकच्या बाजारात कोथिंबिरीची एक जुडी दीडशे ते १६० रुपयावर पोचली. पावसाने उघडीप दिली तर कोथिंबिरीचे भाव थोड्या प्रमाणात घसरतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतकरी पोपट पवार यांनी सांगितले की, पावसाळ्यात कोथिंबिरीचे भाव एवढे वाढत नाही. परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कोथिंबिरीची पिके सडल्याने भाव वाढले आहेत. ज्या शेतकऱ्यांची कोथिंबीरीची पिके शिल्लक राहिली आहेत त्यांना भाववाढीचा फायदा मिळत आहे.