राजगिऱ्याची जुडी दोन रुपयालाही चाकणला कोणी विकत घेईना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजगिऱ्याची जुडी दोन रुपयालाही 
चाकणला कोणी विकत घेईना
राजगिऱ्याची जुडी दोन रुपयालाही चाकणला कोणी विकत घेईना

राजगिऱ्याची जुडी दोन रुपयालाही चाकणला कोणी विकत घेईना

sakal_logo
By

चाकण, ता. १ : येथील महात्मा फुले बाजारात नवरात्रीच्या उपवासासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या राजगिराच्या भाजीची आवक पाच हजार जुड्यांच्यावर आवक झाली. परंतु, भाजीची एक जुडी दोन रुपयालाही कोणी विकत घेईना अशी स्थिती निर्माण झाली आहे, असे राजगिऱ्याची भाजी विक्रीसाठी आणलेले काळूस (ता. खेड) येथील शेतकरी विठ्ठल पवळे यांनी सांगितले.
शेतकरी पवळे यांनी चाकण बाजारात विकण्यासाठी राजगिऱ्याची भाजी आणली. ती भाजी दोन-तीन दिवसांपूर्वी एक जुडी १५ ते २० रुपयांनी विकली जात होती. परंतु, आज भाजीला कोणी गिऱ्हाईक तसेच मागणी नसल्याने बाजारात भाजी मातीमोल झाली. यावेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते विश्वनाथ पोटवडे यांनीही भाजीला मागणी नसल्याने शेतकऱ्याचे नुकसान होत आहे, असे सांगितले. याबाबत शेतकरी पवळे यांनी सांगितले की, नवरात्रीत उपवासासाठी दोन एकर क्षेत्रामध्ये राजगिऱ्याच्या भाजीचे पीक घेतले होते. या भाजीला उठाव होईल अशी आशा होती. परंतु, भाजी मातीमोल झाली. त्यामुळे उत्पादनाचा खर्चही वसूल झाला नाही.