भोसेजवळील अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोसेजवळील अपघातात
पती-पत्नीचा जागीच मृत्यू
भोसेजवळील अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

भोसेजवळील अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

sakal_logo
By

चाकण, ता. ४ : चाकण -शिक्रापूर मार्गावर रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकी व क्रेनची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी असे दोघे जण जागीच ठार झाले. सुदाम गडगे (वय ५०), मीनाक्षी गडगे (वय ४५, दोघेही, रा. संगमनेर, जि. नगर) अशी दोघांची नावे आहेत. ते संगमनेर येथून दुचाकीवरून शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे राहत असलेल्या त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी जात होते. त्यावेळी भोसेजवळील चंद्रलीला हॉटेलजवळ हा अपघात झाल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक विनोद शेंडकर यांनी दिली.
----------------