चाकण- शिक्रापूर मार्गावर साचले तळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकण- शिक्रापूर मार्गावर साचले तळे
चाकण- शिक्रापूर मार्गावर साचले तळे

चाकण- शिक्रापूर मार्गावर साचले तळे

sakal_logo
By

चाकण, ता. १० : येथील माणिक चौकात चाकण-शिक्रापूर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अगदी तीन फुटावर मोठ मोठे खड्डे झाले आहेत. त्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यात दुचाकी अडकत असून, दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. मो ठी वाहने जोरात आदळत आहेत. या मार्गाची एवढी दुरवस्था झाल्यामुळे वाहतूक कोंडी होत असून याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष का होत आहे, असा सवाल नागरिक, वाहनचालकांना पडला आहे.
चाकण-शिक्रापूर मार्ग हा मराठवाडा, मुंबई, नगर या भागाच्या दृष्टीने दळणवळणासाठी महत्त्वाचा आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात कंटेनर, ट्रेलर, बस, गॅस टँकर तसेच इतर वाहने ये -जा करतात. या मार्गाची दुरवस्था पावसामुळे तसेच काही इमारतीचे पाणी या रस्त्यावर काहीजण सोडत असल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पाणी साचले आहे. त्यामुळे मार्गाला तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यातून वाहने कशी चालवायची हा प्रश्न वाहन चालकांना पडतो आहे. विशेषतः दुचाकीस्वार, कारचालक यांना या खड्ड्यात वाहने गेली तर ती मोठ्या प्रमाणात आढळतात. तसेच वाहनांचे नुकसान होते असा महत्त्वाचा प्रश्न आहे. या मार्गाच्या कामाकडे मात्र कोणी लक्ष देत नाही. माणिक चौकापासून काही अंतरावर या मार्गाला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. या खड्ड्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. कंटेनर, ट्रेलर आदी अवजड वाहने मार्गावरून ये जा करत असल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते.

खड्डे न बुजविल्याने कोंडीला निमंत्रण
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागाचे पोलिस प्रयत्न करत असले तरी ते प्रयत्न अपुरे आहेत. मार्ग अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी सोडणार कशी हा प्रश्न आहे. या मार्गावरील खड्डे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुढाकाराने वेळोवेळी बुजविले गेले आहेत. परंतु यावेळी अजूनही खड्डे बुजविले न गेल्यामुळे वाहतूक कोंडीला तसेच अपघातांना आमंत्रण मिळत आहे. या मार्गावरील एका व्यापारी संकुलातून साचलेले पाणी विद्युत पंपाद्वारे उपसून ते मार्गावर सोडले जात आहे.

खड्डे वाचविण्यासाठी तारेवरची कसरत
चाकण येथील माणिक चौकाजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यात पाणी साचल्या त्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा होत असून दुचाकीस्वार तसेच कारचालकांचे अपघात होत आहेत. खड्डे वाचविण्यासाठी महिला दुचाकीस्वारांना तारेवरची करावी लागत आहे. पादचाऱ्यांना मात्र या मार्गावरून पाण्यातून कसे जायचे हा प्रश्न निर्माण होतो आहे.
04119