मेदनकरवाडीतील खुनाची आरोपींकडून कबुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेदनकरवाडीतील खुनाची आरोपींकडून कबुली
मेदनकरवाडीतील खुनाची आरोपींकडून कबुली

मेदनकरवाडीतील खुनाची आरोपींकडून कबुली

sakal_logo
By

चाकण ता, ८ : मेदनकरवाडी, (बोरजाई नगर ता. खेड) येथील आशा देशमुखच्या खूनप्रकरणी तिघांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी आज देवानंद गजानन मनवर (वय २४, रा.वाडा, ता.मानोरा जि. वाशीम) याला ताब्यात घेतले. दरम्यान, या खुनाची सुपारी आशाचा पती गोरक्ष देशमुखने एक लाख रुपयाला गोरक्षचा मित्र रोशन गजानन भगत ऊर्फ रॉकीला दिल्याची कबुली आरोपींनी दिली. तसेच आशा हिचा खून पती गोरक्षने चारित्र्याच्या संशयावरून केल्याचेही तपासात उघड झाले. गोरक्ष याचा चपाती पुरवठ्याचा व्यवसाय असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम गायकवाड यांनी दिली.