चाकणला नगरपरिषदेतर्फे दुभाजकावर वृक्षारोपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकणला नगरपरिषदेतर्फे दुभाजकावर वृक्षारोपण
चाकणला नगरपरिषदेतर्फे दुभाजकावर वृक्षारोपण

चाकणला नगरपरिषदेतर्फे दुभाजकावर वृक्षारोपण

sakal_logo
By

चाकण, ता. १३ : येथील (ता. खेड) मार्केट यार्ड समोरील जुन्या पुणे नाशिक रस्त्याच्या दुभाजकावर नगरपरिषदेच्या वतीने व इतर मंडळाच्या वतीने सुमारे १०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती नगरपरिषद चे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी दिली.
स्वच्छ भारत अभियान २०२३ व माझी वसुंधरा अंतर्गत चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांच्या आवाहनानुसार मयूर मित्र मंडळ, मार्केट यार्ड चाकण यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन गोरे, चाकण नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या पर्यवेक्षक कविता पाटील, आरोग्य विभागाचे वरिष्ठ लिपिक विजय भोंडवे आदी व इतर उपस्थित होते. मार्केट यार्ड समोरील दुभाजकावर शंभर झाडांचे रोपण करण्यात आले.
यावेळी मयूर मित्र मंडळाचे कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. यावेळी वसुंधरेची हरित शपथ घेण्यात आली.
04187