युसूफ काकर खूनप्रकरणी सहा मुख्य आरोपी अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युसूफ काकर खूनप्रकरणी
सहा मुख्य आरोपी अटकेत
युसूफ काकर खूनप्रकरणी सहा मुख्य आरोपी अटकेत

युसूफ काकर खूनप्रकरणी सहा मुख्य आरोपी अटकेत

sakal_logo
By

चाकण, ता. १३ : येथील रिक्षाचालक युसूफ काकर (वय १७) याच्या खूनप्रकरणी चाकण पोलिसांनी जळगाव येथून सहा मुख्य आरोपींसह सहा अल्पवयीन मुलांना (विधी संघर्षित) ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी दिली.

मुख्य आरोपी प्रणव संजय शिंदे (वय १९), आनंदा हनुमंत कोरमशेट्टी (वय १९), निशान देवेंद्र बोगाटी (वय १८), कुलदीप संजय जोगदंड (वय १९), अशोक शंकर चव्हाण (वय ३२), अजय अंकुश कांबळे (वय २४, सर्व रा. चाकण) यांना अटक करण्यात आलेली आहे.

या गुन्ह्यात वापरलेले लोखंडी कोयते, तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. २०२१ मध्ये रोहित सहानी याचा खून झाला होता. सहानीच्या खुनात युसूफ काकर हा मुख्य आरोपी होता. खुनाचा बदला घेण्यासाठी सहानीच्या मित्रांनी कट रचून काकर याचा खून केला होता.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलिस निरीक्षक अनिल देवडे, प्रसन्न जराड, विक्रम गायकवाड, सुरेश शिंदे, राजू जाधव, संदीप सोनवणे, हनुमंत कांबळे, भाग्यश्री जमदाडे आदींनी कारवाईत भाग घेतला.
--------------------