चाकण येथे ब्रेकरची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकण येथे ब्रेकरची चोरी
चाकण येथे ब्रेकरची चोरी

चाकण येथे ब्रेकरची चोरी

sakal_logo
By

चाकण. ता, १६ : येथील चाकण औद्योगिक वसाहतीतील शिंदे-वासुली (ता. खेड) या गावच्या हद्दीत चोरी झाली आहे. येथील सत्येंद्र सिंग यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेतून रात्रीच्या सुमारास दीपक घावटे यांच्या मालकीच्या पोकलेन मशिनचे अडीच लाख रुपये किमतीचे ब्रेकर अज्ञात चोरट्याने चोरून नेले. याबाबत दीपक घावटे( वय 38 रा. शेलू,ता, खेड जि. पुणे) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. या चोरीचा संशय पोकलेन मशिनची ऑपरेटर अल्ताफ फारुक याच्यावर फिर्यादीने व्यक्त केला आहे. तसे तक्रारीत म्हटले आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली.