Sat, Jan 28, 2023

मोबाईल चोरीप्रकरणी
दोघांवर गुन्हा दाखल
मोबाईल चोरीप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
Published on : 18 October 2022, 1:03 am
चाकण, ता. १८ : महाळुंगे (ता. खेड) येथे एका पादचारी तरुणाचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. याप्रकरणी प्रतीक भास्कर वाघ (वय २७, रा. महाळुंगे) याने पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना सोमवारी (ता. १७) रात्री साडेबाराच्या सुमारास घडली.
प्रतीक हा सोमवारी रात्री पायी घरी चालला होता. त्यावेळी अंकुश रमेश कारले (वय २१, रा. चांदूस, ता. खेड) व मयूर मच्छिंद्र पिलगर (वय २३, रा. चाकण, ता. खेड) हे त्याच्याजवळ दुचाकीवरून आले व त्याच्या हातातील मोबाईल चोरून नेला. या मोबाईलची किंमत नऊ हजार रुपये आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे व पोलिस उपनिरीक्षक विलास गोसावी यांनी दिली.