कमी पटाच्या शाळा बंद होणार नाहीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कमी पटाच्या शाळा बंद होणार नाहीत
कमी पटाच्या शाळा बंद होणार नाहीत

कमी पटाच्या शाळा बंद होणार नाहीत

sakal_logo
By

चाकण, ता. २१ : ‘‘राज्यात कमी पटाच्या शाळा बंद होणार, ही अफवा आहे. तसा कोणताही जीआर राज्य सरकारकडून जिल्हा परिषदेला आलेला नाही. शिक्षकांनी नवीन उपक्रम राबविताना जुन्या उपक्रमांकडे दुर्लक्ष करू नये. पालक ज्या अपेक्षेने मुलांना शाळेत घालतात, त्या अपेक्षाही पूर्ण झाल्या पाहिजेत,’’ असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केले.
‘सकाळ’च्या वतीने ‘चला गुरुसी वंदू’ या पुस्तकाचे प्रकाशन आयुष प्रसाद यांच्या हस्ते रासे-भोसे (ता. खेड) येथील ‘मुक्ता लॉन्स’मध्ये झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील १०४ शिक्षकांना गौरविण्यात आले. त्यावेळी आयुष प्रसाद यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘अमेरिकेत व परदेशात शैक्षणिक दर्जा उच्च आहे. आपल्याला शिक्षणाचा दर्जा उंचवायचा आहे. विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत. आदर्श शाळा व शैक्षणिक धोरण कसे असावे याचाही विचार करण्याची गरज आहे. पुणे जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर आहे. नवीन उपक्रम करताना जुन्या उपक्रमाकडे दुर्लक्ष करू नका. काही लोकांकडून शाळेच्या मदतीसाठी, काही उपक्रमासाठी निधी घेताना शासनाच्या नियमांचे पालन करा. मी काय केले, ते इतरांनी स्वीकारावे, ही अपेक्षा ठेऊन काम करू नये. राज्य सरकारने जे सांगितले, ते करा. ’’
‘सकाळ’चे मुख्य उपसंपादक नीलेश शेंडे यांनी प्रास्ताविक; तर ‘सकाळ’ ‘एनआयई’चे सहव्यवस्थापकविशाल सराफ यांनी सूत्रसंचालन केले. बातमीदार दिलीप वळसे पाटील यांनी आभार मानले. यावेळी उपसरव्यवस्थापक मिलिंद भुजबळ, जाहिरात वरिष्ठ व्यवस्थापक संतोष पोटे, व्यवस्थापक दत्ता मारकड, रमेश शिंदे, सुरेश फरगडे आदी उपस्थित होते. ‘मुक्ता लॉन्स’चे मालक मनोज मांजरे यांनीही सहकार्य केले. तसेच, जाहिरातदार आशिष येळवंडे व शीतल येळवंडे,
समर्थ विद्यालय, द्वारका इंग्लिश स्कूल, भगवान पोखरकर, ऊर्जा फूड्स, सुनील भेके, जिल्हा परिषद शाळा कोलतवडे, वल्लभ शेळके, सह्याद्री व्हॅली कॉलेज, शिरूर तालुका शिक्षक संघ, अविनाश बलकवडे, सचिन खैरे, माधवराव शेळके आदींचा सन्मान करण्यात आला.

समाजाची संस्कृती घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. स्वतः चांगले आचरण करून विद्यार्थ्यांना शिकविले पाहिजे. नुसते बोलून चालत नाही. संविधानामध्ये असलेल्या न्याय समाजाची आपण उभारणी केली पाहिजे. चांगल्या समाजाची रचना शिक्षकांनी केली पाहिजे. चांगली शिक्षण पद्धती राबवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी प्रयत्न करा.
- आयुष प्रसाद,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

गौरविण्यात आलेले गुरुजन
आबासाहेब जाधव, अजय जाधव, अमित पावशे, अनंता लोहकरे, डॉ. अनिल काळे, अनिल शिंदे, अंजली वाळुंज, अंकुश शिंगाडे, अर्जुन कांबळे, अशोक लांडे, अशोक साबळे, बाबाजी वामनराव ठाकूर-पाटील, बाबासाहेब कुंभार,
बाळासाहेब चव्हाण, बाळासाहेब गिलबिले, बाळासाहेब इंदोरे, भारती मोरे, बिभीषण शेरखाने, चंद्रकांत फुले, चंद्रकांत नाईकडे, चांगदेव मसुरकर, दासोपंत स्वामी उंडाळकर-आळंदीकर, दत्तात्रेय मेचकर, दिनेश मेहेर, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था अजित वडगावकर, ज्ञानेश्वर निमोणकर, डॉ. फुलचंद चाटे, गणेश गावडे, महंत स्वामी गणेशानंद महाराज पुणेकर, गौतम सोनवणे, ग्लॅडिओलस इंग्लिश मीडियम स्कूल चाकण, प्राचार्य. डॉ. के. जी. कानडे, कावेरी ढमढेरे, खंडू कारंडे, मच्छिंद्रनाथ झांजरे, माधवी लोंढे, मधुकर गिलबिले, मंगेश मेहेर, मनीषा कानडे, मनीषा पाटील, दीपाली जाधव, मनोहर कामठे, मच्छिंद्र शेटे, मिहीर आगटे, मोहन नाडेकर, मृणाल गांजाळे-शिंदे, हसीना मुल्ला, नागनाथ विभूते, प्रा. नीलेश आमले, पंढरीनाथ कातळे, प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूलचे महेंद्र सिंग, प्रा. प्रशांत लाव्हरे, प्रवीण काळे, पुनाजी पारधी, राजाराम ढाळे, राजाराम काथेर, राजेंद्र भोसले, राजू जाधव, राजू घोडके, रामदास अभंग, रामदास तनपुरे, राणी गाडेकर, प्रा. रविन जगदाळे, रियाज शेख, रोहिदास बांबळे, रोहिदास साळी, रोहिदास सोनवणे, सचिन बेंडभर, संजीवनी कहाणे-घाटकर, संभाजी लोखंडे, शरद सोलाट, संदीप दातीर, संदीप वाघोले, संजय मारणे, संजय वाल्हेकर, संजय रणदिवे, संतोष शिंदे,
डॉ. शशिकांत साळवे, शैलेंद्र चिखले, शिवाजी घोगरे, शोभा भोसले, प्रा. डॉ. श्रीकांत फुलसुंदर, प्राचार्य डॉ. शत्रुघ्न थोरात, स्मिता लोंढे, सोमनाथ गजरे, सुभाष मोहरे, सुचित्रा साठे, सुजाता भालेराव, सुनंदा ढमाले, सुनील वळसे पाटील, सुनीता विधाटे, सुरेश हुले, सुरेश जारकड, सुवर्णा गारगोटे, सुवर्णा नेवसे, तुकाराम बेनके,
उज्ज्वला लोहकरे, विक्रम कदम, विनोद बोंबले, डॉ. विठ्ठल शिंदे, बारीकराव खेसे, बाळासाहेब फडतरे.

CHN22B04265