दिवाळीत चाकण येथे प्रवाशांची लूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीत चाकण येथे प्रवाशांची लूट
दिवाळीत चाकण येथे प्रवाशांची लूट

दिवाळीत चाकण येथे प्रवाशांची लूट

sakal_logo
By

चाकण, ता. २३ : दिवाळीच्या सणाला घरी निघालेल्या प्रवाशांची, कामगारांची लूट रिक्षावाले पिकअपवाले, प्रवासी वाहतूक करणारे कारवाले यांनी मोठ्या प्रमाणात केली आहे. त्याचा फटका नागरिक, कामगारांना बसला आहे. चाकण-शिक्रापूर या मार्गासाठी केवळ तीस किलोमीटर अंतरासाठी शंभर रुपये भाडे अवैध प्रवासी वाहतूक करणारे घेत आहेत. वाहतूक कोंडीचे कारण दाखवून ही लूट सर्रास चालू आहे. प्रवाशांना मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे.
खासगी बस चालकांनीही नगर, औरंगाबाद, बीड प्रवासासाठी तिप्पट चौपटीने भाडे आकारले आहे हे भयानक वास्तव आहे. कामगार नगर, मराठवाड्यातील असून त्यांचा प्रवास चाकण, शिक्रापूर, नगर, औरंगाबाद, बीड असा आहे. शिक्रापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने धावतात. प्रवाशांना गावी जाण्यासाठी त्या वाहनातून प्रवास करावा लागत आहे. शिक्रापूर मार्गावर पीएमपीएमएल बसचे भाडे फक्त चाळीस रुपये आहे.
अवैध प्रवासी वाहतूक करणारे शंभर रुपये एका प्रवाशाकडून भाडे घेतात. त्यामुळे प्रवाशांची मोठी लूट होत आहे. याकडे कोणाचे लक्ष नाही. प्रवाशांची अवस्था ''ना घर का ना घाट का'' अशी झाली आहे. दिवाळीला गावी निघालेले कामगार वर्ग व इतर नागरिक मिळेल त्या वाहनाचा आसरा घेत आहेत. यामध्ये महिला,लहान मुले तरुण-तरुणी यांचा समावेश मोठा आहे. वाहतूक कोंडीमुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी दर वाढवले आहेत.असे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान कामगारांनी, प्रवाशांनी सांगितले की,वाहतूक कोंडीमुळे अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहन चालक चक्क लूट करत आहेत. लहान मुले, महिला, तरुणी बरोबर आहेत. त्यामुळे रात्री अप रात्रीचा हा प्रवास असल्याने प्रवासी मिळेल ते वाहन शोधून प्रवास करत आहे.

04278