वाहतूक कोंडीत खरेदी कशी करायची? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक कोंडीत खरेदी कशी करायची?
वाहतूक कोंडीत खरेदी कशी करायची?

वाहतूक कोंडीत खरेदी कशी करायची?

sakal_logo
By

चाकण, ता. २४ ः बाजारात दिवाळीची खरेदी करण्यासाठी कामगार वर्ग आणि इतरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या गर्दीतच कंटेनरसह अवजड वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. या कोंडीचा खरेदीसाठी आलेल्या नागरिकांसह वाहनचालकांना त्रास सोसावा लागला. कोंडीमुळे दिवाळीच्या उत्साहावर विरजण पडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

चाकण (ता. खेड) येथील जुन्या पुणे- नाशिक रस्त्यावर तसेच नव्या पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात आज वाहतूक कोंडी झाली होती. रात्रीचे आठ वाजलेतरी कोंडी फुटत नव्हती. यामुळे बाजारात खरेदी करण्यासाठी आलेला ग्राहक वर्ग हैराण झाला होता. कंटेनर, ट्रेलरच्या जाम गर्दीमुळे सारेच वैतागले आहेत. पोलिस वाहतूक नियंत्रण करत असले, तरी त्यांनाही मर्यादा आहेत. वाढती अतिक्रमणे, वाढती वाहनांची संख्या यात मात्र नागरिक, प्रवासी, वाहनचालक हरवला आहे. या वाहतूक कोंडीत खरेदी कशी करायची, हा प्रश्न मात्र नागरिक कामगार यांना पडला आहे. प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.
-----------------

Media Ids : CHN22B04284