दमदाटी करून माल चोरणाऱ्यांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दमदाटी करून माल चोरणाऱ्यांवर गुन्हा दाखल
दमदाटी करून माल चोरणाऱ्यांवर गुन्हा दाखल

दमदाटी करून माल चोरणाऱ्यांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By

चाकण, ता. २५ : येथील औद्योगिक वसाहतीतील पुणे- नाशिक महामार्गावरील कुरुळी फाटा (ता. खेड) येथे कंपनीचा माल भरलेला टेम्पो चौघांनी अडवला. चालकाला शिवीगाळ, दमदाटी करत टेम्पोची काच फोडली. यावेळी चालकाचा दोन हजार रुपये किमतीचा मोबाईलही ते घेऊन गेले. तसेच टेम्पोतील सुमारे एक लाख ३७ हजार सहाशे रुपये किमतीचे साहित्य असलेले मिंडा स्पार्क कंपनीचे दोन बॉक्स अज्ञातांनी चोरून नेले. याप्रकरणी टेम्पो चालक मस्तान हसन पटेल (वय २४, रा. बोटा, ता. अकोले, जि- नगर) याने पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चार अनोळखी तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती महाळुंगे चौकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली.