खेडच्या बटाट्यास दिल्ली, उत्तर प्रदेशात पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेडच्या बटाट्यास दिल्ली, उत्तर प्रदेशात पसंती
खेडच्या बटाट्यास दिल्ली, उत्तर प्रदेशात पसंती

खेडच्या बटाट्यास दिल्ली, उत्तर प्रदेशात पसंती

sakal_logo
By

चाकण, ता. २९ : येथील (ता. खेड) महात्मा फुले बाजारातील खेड तालुक्यातील नवीन आलेला बटाट्याला दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशात मोठी मागणी आहे. नव्याने काढणी केलेल्या नवीन गावरान लाल मातीतील बटाट्याला पसंती मिळत आहे. त्यास आज (ता.२९) २० ते कमाल २६ रुपये प्रति किलोचा बाजारभाव मिळाला. बाजारात गावरान बटाट्याची सुमारे तीन हजार क्विंटल, सहा हजार पोत्यांची आवक झाली आहे.
चाकण येथील महात्मा फुले बाजारात परराज्यातील व्यापारी मोठ्या प्रमाणात बटाटा खरेदी करत आहेत. महात्मा फुले बाजारात खेड तालुक्यातील पश्चिम डोंगराळ भागातील नव्याने काढणी केलेला लाल मातीतील बटाटा विक्रीसाठी येत आहे. बटाट्याला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने येथील व्यापारी दिल्ली, उत्तरप्रदेशातील बनारस, लखनौ, बरेली, झांसी, पिलीभीत तर मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर, इंदौर, भोपाळ येथे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात पाठविला जातो. दिल्ली तसेच इतर राज्यातील व्यापारी येथे बटाटा खरेदी करण्यासाठी येत आहेत, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, व्यापारी विक्रम शिंदे, जमीरभाई काझी यांनी दिली.

चाकणमधील बाजारात या हंगामातील नवीन गावरान बटाटा विक्रीसाठी येण्यास सुरुवात झाली आहे. सुमारे तीनशे वर टन नवीन बटाटा आज विक्रीसाठी आला आहे. बटाट्याला प्रति किलोला किमान २० ते कमाल २६ रुपये भाव मिळाला.

शेतकरी पोपट पवार, बाळासाहेब साकोरे यांनी सांगितले की, येथील महात्मा फुले बाजारात पावसाळी हंगामात डोंगराळ भागातील नवीन गावरान बटाटा विक्रीस येतो. या बटाट्याला परराज्यातून मोठी मागणी असते त्यामुळे या बटाट्याला भावही चांगले मिळतात. पावसाचा फटका बसल्याने बटाटा पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सरासरी उत्पादन खर्च निघेल.

गावरान लाल मातीतील बटाट्याला मागणी चांगली असल्याने भाव चांगला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वसूल होत आहे. असेच भाव टिकून राहिले पाहिजे तसेच वाढले पाहिजेत.
- विक्रम शिंदे, शेतकरी

चाकण येथील नव्याने काढणी केलेल्या गावरान लाल मातीतील बटाट्याला दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश मध्ये मोठी मागणी असते. त्यामुळे येथील बटाटा खरेदी करण्यासाठी त्या राज्यातील व्यापारी येथे येतात. लाल मातीतील बटाट्याला मागणी मोठी असल्याने या बटाट्याची आम्ही मोठ्या प्रमाणात खरेदी करतो.
-जावेद भाई, व्यापारी

04327