चाकणला बेकायदा पार्किंग नागरिक त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकणला बेकायदा पार्किंग नागरिक त्रस्त
चाकणला बेकायदा पार्किंग नागरिक त्रस्त

चाकणला बेकायदा पार्किंग नागरिक त्रस्त

sakal_logo
By

चाकण, ता. ५ : येथील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चाकण (ता.खेड) तसेच अन्य ठिकाणी बेकायदा पार्किंग वाहनतळ वाढतच आहेत. अवैध रिक्षा, खासगी वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. यामुळे नागरिकांचा, वाहनचालक, प्रवासी त्रस्त झाले आहेत.
पुणे -नाशिक महामार्गावर अस्ताव्यस्त वाहने उभी केली जातात. त्यामुळे येणाऱ्या -जाणाऱ्या वाहनांना तळेगाव चौकात, आंबेठाण वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने भोसरी बाजूकडे जाणाऱ्या मार्गांवर तसेच तळेगाव बाजूकडे, राजगुरुनगर बाजूकडे मार्गांवर कशीही अस्ताव्यस्तपणे लावली जातात. अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहन चालक इतर वाहन चालकांना दादागिरी करतात. वेळप्रसंगी भांडणाचे रूपांतर मारामारीत होते. बेकायदा पार्किंगकडे मात्र कोणाचेच लक्ष नाही. ही बेकायदा पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी वाहतूक विभागाने कारवाई नागरिकांकडून होत आहे.
चाकण-शिक्रापूर, चाकण -तळेगाव, चाकण-आंबेठाण, राजगुरुनगर, भोसरी या मार्गावर प्रवाशांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या तीन चाकी रिक्षांची तसेच जीप, सहाआसनी ची संख्या ही मोठी आहे. ही वाहने अस्ताव्यस्तपणे चौकात उभी केली जातात. त्यामुळे येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनांना अडथळा होतो व वाहतूक कोंडीत भर पडते. पण ही बेकायदा प्रवासी वाहतूक करणारी वाहने अस्ताव्यस्तपणे लावली जातात. पोलिसांची कारवाई होते परंतु ही मलमपट्टी असते. जशीच्या तशी पुन्हा लावली जातात. चाकण नगरपरिषदेने p१ p२ पार्किंगचे फलक लावले असले तरी सम, विषम तारखेची पार्किंग अजून सुरू केलेली नाही. त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे सुरू केली पाहिजे असेही नागरिकांचे म्हणणे आहे.


04366