बहुळ येथे आढळला अनोळखी मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बहुळ येथे आढळला
अनोळखी मृतदेह
बहुळ येथे आढळला अनोळखी मृतदेह

बहुळ येथे आढळला अनोळखी मृतदेह

sakal_logo
By

चाकण, ता. ६ : बहुळ (ता. खेड) गावच्या हद्दीत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आज सकाळी आढळला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. मृतदेहाच्या अंगावर काळ्या रंगाचा टी-शर्ट, निळ्या रंगाची जीन्स आहे. मृतदेह आढळल्याची माहिती बहुळचे पोलिस पाटील केशव साबळे यांनी पोलिसांना दिली. मृत तरुणाचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष आहे. मृतदेह ससून हॉस्पिटल पुणे येथे नेण्यात आला आहे. याबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी चाकण पोलिस ठाण्याशी (०२१३५-२४९३३३) संपर्क साधावा असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक विनोद शेंडकर यांनी केले.