टेम्पो चालकाला आंबेठाणमध्ये मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेम्पो चालकाला
आंबेठाणमध्ये मारहाण
टेम्पो चालकाला आंबेठाणमध्ये मारहाण

टेम्पो चालकाला आंबेठाणमध्ये मारहाण

sakal_logo
By

टेम्पो चालकाला
आंबेठाणमध्ये मारहाण
चाकण, ता. ८ : येथील औद्योगिक वसाहतीतील आंबेठाण (ता. खेड) येथील ॲमेझॉन कंपनीत शिरून एका टेम्पो चालकाला शिवीगाळ करून कमरेच्या पट्ट्याने, तसेच फरशी पुसण्याच्या दांडक्याने मारहाण केली, तसेच टेम्पोच्या काचा फोडून नुकसान केल्याची फिर्याद सतीश हरिभाऊ झिरपे (वय ३१, रा. बंगाली पिंपळा, ता. गेवराई, जि. बीड, सद्या रा. ॲमेझॉन कंपनी, आंबेठाण) यांनी दिली आहे. याप्रकरणी आरोपी वैभव बाळू नाईकनवरे व इतर सात ते आठ जणांवर (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही)यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाळुंगे पोलिस चौकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार काल रात्री साडेबाराच्या सुमारास घडला. फिर्यादी झिरपे हे त्यांचा टेम्पो घेऊन कंपनीकडे चालले असताना वराळे गावच्या हद्दीमध्ये पुढे चाललेल्या दुचाकीस्वारांना बाजूला होण्यासाठी हॉर्न त्यांनी वाजवला. हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून चिडून जाऊन आरोपींनी टेम्पोचा पाठलाग केला. टेम्पो कंपनीच्या गेटमधून आत गेल्यानंतर आरोपींनी कंपनीत घुसत फिर्यादी झिरपे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. ‘तू कंपनीच्या बाहेर ये, तुला दाखवितो’ अशीही धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.