अवजड वाहनांमुळे रात्री अपघाचा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवजड वाहनांमुळे रात्री अपघाचा धोका
अवजड वाहनांमुळे रात्री अपघाचा धोका

अवजड वाहनांमुळे रात्री अपघाचा धोका

sakal_logo
By

चाकण, ता.२० : येथील (ता. खेड) पुणे-नाशिक महामार्गावर काही कंपन्यासमोर रात्रीच्या वेळी बेकायदा अवजड वाहने उभी केली जातात. त्यामुळे नाशिक बाजूकडे जाणाऱ्या वाहनांना ती अडथळा ठरत आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. एमआयडीसी चौकाजवळील अनेक कंपन्याजवळील वाहने उभी असल्याने ती वाहन चालकांना दिसत नाहीत. त्यामुळे वाहनावर वाहतूक विभागाच्या पोलिसांनी कारवाई करावी, अशी वाहनचालक तसेच कामगारांकडून होत आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी, नाणेकरवाडी गावच्या हद्दीतील कंपन्यासमोर ही अवजड वाहने कंटेनर, ट्रेलर उभी केली जातात. रस्ता अरुंद त्यात ही अवजड वाहने उभी केल्याने जाणाऱ्या वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. या वाहनांमुळे वेगात जाणारी नाशिकला जाणारी वाहने काही वेळा या वाहनावर आदळतात तसेच दुचाकी आदळतात. त्यातून अनेक वेळा अपघात होत आहेत. औद्योगिक वसाहतीतील वाहनतळ सुरू नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. याकडे औद्योगिक महामंडळाने लक्ष द्यावे तसेच वाहतूक विभागाने लक्ष द्यावे असे वाहनचालक, प्रवासी कामगार, उद्योजक यांचे म्हणणे आहे.

बेकायदा पुणे -नाशिक महामार्ग तसेच इतर रस्त्यावर जे वाहने उभी करतात त्या वाहनावर कारवाई केली जाईल. त्यांनी रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने वाहने उभी करू नयेत. अडथळा ठरणाऱ्या वाहनावर कारवाई केली जाते.
- शंकर डामसे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाहतूक विभाग

04406