‘पीएमआरडीए’च्या आयुक्तांशी खेडमधील कामांसंदर्भात चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पीएमआरडीए’च्या आयुक्तांशी
खेडमधील कामांसंदर्भात चर्चा
‘पीएमआरडीए’च्या आयुक्तांशी खेडमधील कामांसंदर्भात चर्चा

‘पीएमआरडीए’च्या आयुक्तांशी खेडमधील कामांसंदर्भात चर्चा

sakal_logo
By

चाकण, ता. १२ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल यांना खेड तालुक्यातील ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील विविध प्रलंबित विकासकामांसंदर्भात भेट घेऊन निवेदन दिले व चर्चा केली, अशी माहिती ‘पीएमआरडीए’चे सदस्य वसंत भसे यांनी दिली
खेड तालुक्यात ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून मेदनकरवाडी ते रासे या बाह्यवळण मार्गाच्या कामाला गती मिळावी, जलजीवन मिशन अंतर्गत येणाऱ्या गावांमधील विहिरींच्या जागेसाठी अभिप्राय मिळावा, त्याचप्रमाणे क्रीडांगणे आणि शाळांसाठी आरक्षित असलेल्या पीएमआरडीए हद्दीतील ग्रामपंचायतींना आयुक्त यांचा अभिप्राय लवकरात लवकर मिळावा, या प्रमुख मागण्या बैठकीत मांडण्यात आल्या. यावर लवकरच कारवाई करण्यासंदर्भात आयुक्त महिवाल यांनी आश्वासित केले.
यावेळी सरपंच विलास मांजरे, भगवान मांजरे, रामदास मांजरे, पिराजी मांजरे, संतोष बोत्रे आदी उपस्थित होते.