जोपादेवी सोसायटीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत तुळवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोपादेवी सोसायटीच्या 
अध्यक्षपदी चंद्रकांत तुळवे
जोपादेवी सोसायटीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत तुळवे

जोपादेवी सोसायटीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत तुळवे

sakal_logo
By

चाकण, ता. १३ : जोपादेवी विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत तुळवे व उपाध्यक्षपदी आशा अर्जुन बोत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष रामदास बोत्रे व उपाध्यक्ष राजू बोत्रे यांनी राजीनामा दिला होता.
खेड तालुक्याचे शिवसेना नेते व माजी उपसभापती अमोल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक बिनविरोध झाली. या वेळी खेड तालुका शिवसेना प्रमुख रामदास धनवटे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची भेट घेऊन अभिनंदन केले. सर्व समर्थकांनी भंडारा उधळून जल्लोष केला. संचालक बाळासाहेब हगवणे, उत्तम पवार, ईश्वर बोत्रे, भागूबाई बोत्रे, सर्जेराव बोत्रे, ज्ञानेश्वर बोत्रे, राजाराम येळवंडे, माजी उपसरपंच दिलीप बोत्रे, संजय पवार, रवींद्र पवार, विकास तुळवे, सुरेश बोत्रे, किरण गाडे,कालिदास बोत्रे, धनंजय बोत्रे, मंगेश येळवंडे, दशरथ बोत्रे आदी उपस्थित होते.