सराईत गुन्हेगाराला रुग्णालयात नेल्याची चौकशीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सराईत गुन्हेगाराला रुग्णालयात 
नेल्याची चौकशीची मागणी
सराईत गुन्हेगाराला रुग्णालयात नेल्याची चौकशीची मागणी

सराईत गुन्हेगाराला रुग्णालयात नेल्याची चौकशीची मागणी

sakal_logo
By

चाकण, ता. १३ : जीवघेणा हल्ला केल्याच्या गुन्ह्यात आरोपी प्रीतम शंकरसिंग परदेशी याचा उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याला चाकण पोलिसांनी अटक केली. त्यानंतर खेड न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. चाकण पोलिसांनी परदेशी याला येरवडा कारागृहात न नेता खेड येथील रुग्णालयात नेले, तेथून महापालिकेच्या रुग्णालयात नेले. तेथून पुण्यातील ससून रुग्णालयात नेले. चाकण पोलिसांनी त्याला कोणताही आजार नसताना त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली नाही, असा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे फिर्यादी उदय विजय परदेशी (वय ४२, रा. चाकण) यांनी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे केली आहे.