चाकणला भाजपचे रास्ता-रोको आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकणला भाजपचे रास्ता-रोको आंदोलन
चाकणला भाजपचे रास्ता-रोको आंदोलन

चाकणला भाजपचे रास्ता-रोको आंदोलन

sakal_logo
By

चाकण, ता. १७ : चाकण-तळेगाव मार्गाच्या दुरवस्थेबाबत व मार्गाचे डांबरीकरण लवकर करावे, अशी मागणी करून खेड तालुका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी चाकण (ता. खेड) येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
चाकण येथे चाकण-तळेगाव मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्याची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सातत्याने होते. तळेगाव-चाकण-शिक्रापूर या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघातात गेल्या दोन वर्षात अडीचशे लोकांचे जीव गेले आहेत. या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या पदाधिकारी व इतर कार्यकर्त्यांनी चाकण येथील तळेगाव चौकाजवळ आंदोलन करून जाहीर सभा घेतली.
यावेळी भाजपचे कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाणेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर, अमृत शेवकरी, गुलाब खांडेभराड, मनोज मांजरे, सूर्यकांत मुंगसे, अजय जगनाडे, अनिल सोनवणे, प्रीतम शिंदे, दत्ता परदेशी, चाकण-तळेगाव मार्ग कृती समितीचे अध्यक्ष नितीन गाडे, संदेश जाधव, कुशल जाधव आदी आदी उपस्थित होते. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विचार व्यक्त करून मार्गाचे लवकरात लवकर काम झाले पाहिजे. काम झाले नाही; तर यापुढे तीव्र आंदोलन तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल, असे सांगितले.

आंदोलनाच्या पुढे काम सुरू
हे आंदोलन सुरू होते, पण पुढे मार्गाचे डांबरीकरणाचे काम मजूर व मशिनच्या साहाय्याने चालू होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व वाहतूक विभागाचे पोलिस अधिकारी हे काम करून घेत होते. त्यामुळे आंदोलन सुरू आणि रस्त्याचे काम सुरू, हा नेमका प्रकार काय आहे, असा नागरिकांनाही प्रश्न पडला.