कोरेगाव फाट्यावर वाहतूक व्यवसायिकाला लुटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरेगाव फाट्यावर वाहतूक व्यवसायिकाला लुटले
कोरेगाव फाट्यावर वाहतूक व्यवसायिकाला लुटले

कोरेगाव फाट्यावर वाहतूक व्यवसायिकाला लुटले

sakal_logo
By

चाकण, ता.१७ : औद्योगिक वसाहतीतील आंबेठाण (ता. खेड) गावच्या हद्दीतील कोरेगाव फाटा येथील रुद्र ट्रान्सपोर्टच्या कार्यालयासमोर समोर उभ्या असलेल्या गाडीच्या काचेवर दगड मारून नुकसान केले. तसेच वाहतूक व्यावसायिक संदीप सुरेश पडवळ (वय २७) यांना धक्काबुक्की करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम दोन लाख रुपये व साठ हजार रुपये किमतीची सोन्याची गळ्यातील चैन जबरदस्तीने हिसकावून आरोपी पळून गेले. याप्रकरणी संदीप पडवळ यांनी महाळुंगे पोलिसात फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांनी मोहित कोळेकर (करंजविहिरे ता. खेड) व त्याचा मित्र या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती महाळुंगे पोलिस चौकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी आज दिली.