चाकणच्या तरुणांकडून जखमी घारीला जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकणच्या तरुणांकडून जखमी घारीला जीवदान
चाकणच्या तरुणांकडून जखमी घारीला जीवदान

चाकणच्या तरुणांकडून जखमी घारीला जीवदान

sakal_logo
By

चाकण, ता, १८ : येथील आंबेडकर नगरमध्ये (ता. खेड) तरुणांनी पतंगाच्या धारदार मांजात अडकल्यामुळे जखमी झालेल्या घारीला जीवदान दिले. मांजात अडकून घार झाडावर पडली होती. झाडावरून काढून तरुणांनी तिच्यावर त्वरित उपचार केले.
पक्षिमित्र किरण इंगळे, मयूर बेंद्रे, अक्षय घोगरे, हितेश घोगरे या तरुणांनी काठीच्या मदतीने घारीला झाडावरून अलगद खाली काढले. पतंगाचा मांजा तिच्या शरीराभोवती लपेटल्यामुळे ती गंभीर जखमी झाली होती. दरम्यान, घार पूर्णपणे बरी झाल्यानंतर तिला जंगलात सोडून देण्यात येणार असल्याचे इंगळे यांनी सांगितले.

04450