पासधारकांच्या वाहनांनाच प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पासधारकांच्या 
वाहनांनाच प्रवेश
पासधारकांच्या वाहनांनाच प्रवेश

पासधारकांच्या वाहनांनाच प्रवेश

sakal_logo
By

चाकण, ता. १८ : कार्तिकी यात्रेनिमित्ताने आळंदीत मोठ्या प्रमाणात लाखो भाविकांची गर्दी होत आहे. दिंड्या, पालख्या राज्यातून येत आहेत. त्यामुळे आळंदी शहरात मुख्य रस्त्यावर पोलिसांच्या वतीने बॅरिकेड लावले आहेत. त्यातून पोलिसांनी पास दिलेल्या दिंडीतील वाहनांनाच आळंदीत प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच, पास दिलेल्या स्थानिक नागरिकांना प्रवेश देण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत पोलिसांच्या वतीने चाकण, मोशी, देहू, धानोरे फाटा, पुणे मार्ग या विविध ठिकाणी बॅरिकेड लावलेले आहेत. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे, अशी माहिती आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे यांनी दिली.