आळंदीत १३० सीसीटीव्हीची ''वॉच'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदीत १३० सीसीटीव्हीची ''वॉच''
आळंदीत १३० सीसीटीव्हीची ''वॉच''

आळंदीत १३० सीसीटीव्हीची ''वॉच''

sakal_logo
By

चाकण, ता.२१ : आळंदी (ता. खेड) येथे नगरपरिषदेतर्फे विविध ठिकाणी १३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पोलिस ठाणे तसेच नगरपरिषदेतही मोठे स्क्रीन बसविल्याने कार्तिकीवारीतील गैरप्रकार रोखण्यासाठी मोठी मदत होत आहे तसेच वारीवरही नियंत्रण ठेवले जात आहे, अशी माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली.

अलंकापुरीत सुमारे पाच लाख भाविक दाखल झाले आहेत. गर्दीचा फायदा घेऊन चोर महिलांचे दागिने तसेच वस्तू लांबवितात. याला आळा घालण्यासाठी सीसीटीव्हीचा फायदा होत आहे. मागील काही दिवसांमध्ये काही टोळ्या, चोरट्यांना पोलिसांना जेरबंद केले आहे. गर्दीच्या ठिकाणी विविध रस्त्यावर,घाटावर मंदिर परिसरात असे सीसीटीव्ही फुटेज बसविण्यात आलेले आहेत. त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज वेळोवेळी तपासले जात आहेत.

अशी आहे वारीमध्ये व्यवस्था
१. शहारामध्ये फिरती ३१० स्वच्छतागृहे
२. २३ टँकरच्या माध्यमातूनही पाणीपुरवठा
३. सुलभ इंटरनॅशनलची २४१ स्वच्छतागृहे
४. तीन शिफ्टमध्ये सफाई कामगारांची नियुक्ती
५. एनडीआरएफचे २१ जवान तैनात


वारकरी, भाविकांना पाणीटंचाईची समस्या भेडसावू नये म्हणून योग्य ती व्यवस्था केलेली आहे. डास उत्पत्तीची जी ठिकाणे आहेत त्या ठिकाणी धुरळणी यंत्राद्वारे विविध ठिकाणी वारंवार फवारणी केली जात आहे.
- अंकुश जाधव, मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद

वारीमध्ये जे भाविक वाट चुकतात, रस्ते चुकतात. त्यांना शोधण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उपयोग होत आहे. पोलिसांकडून फिरत्या वाहनातून ध्वनीक्षेपकाद्वारे चुकलेल्या व्यक्तींची माहिती देण्यात येत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, तरुण, तरुणी, महिला, लहान मुले यांचा समावेश अधिक आहे.
- सुनील गोडसे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

04475