खराबवाडीत महिलेचा डोक्यात दगड घालून खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खराबवाडीत महिलेचा डोक्यात दगड घालून खून
खराबवाडीत महिलेचा डोक्यात दगड घालून खून

खराबवाडीत महिलेचा डोक्यात दगड घालून खून

sakal_logo
By

चाकण, ता. २० : खराबवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीत ओढ्याजवळ सुमारे २७ वर्षे वयाच्या विवाहित महिलेचा मृतदेह रविवारी (ता.२०) सायंकाळी सातच्या सुमारास आढळला. महिलेच्या अंगात निळ्या रंगाचा टॉप, पांढऱ्या रंगाची लेगिन्स घातलेली आहे. डोक्यात दगड घालून तसेच चाकूचे वार करून तिचा खून केल्याचे आढळून आले आहे. मृतदेहाजवळ दगड तसेच चाकू सापडलेला आहे. याबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी महाळुंगे पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. या महिलेच्या मृतदेहाची अजून ओळख पटलेली नाही अशी माहिती महाळुंगे पोलिस चौकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली.