चाकणला वाटाणा @ ६० रुपये किलो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकणला वाटाणा @ ६० रुपये किलो
चाकणला वाटाणा @ ६० रुपये किलो

चाकणला वाटाणा @ ६० रुपये किलो

sakal_logo
By

चाकण, ता. २३ : येथील (ता.खेड) महात्मा फुले बाजारात मध्य प्रदेशातून आज (ता.२३) हिरव्या वाटाण्याची मोठी आवक झाली. त्यास प्रति किलोला ६० रुपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती व्यापारी रवींद्र बोराटे यांनी दिली.
चाकण येथील बाजारात सध्या परराज्यातून मोठ्या प्रमाणात फळभाज्यांची आवक होत आहे. यामध्ये हिरव्या वाटाण्याची आवक अधिक होती. हा वाटाणा चांगल्या प्रतीचा आहे. बाजारात सध्या टोमॅटोचे भाव घसरले आहेत. टोमॅटोला घाऊक बाजारात प्रति किलोला आठ रुपये भाव मिळाला. टोमॅटोच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे, असे कुमार गोरे, आबा गोरे यांनी सांगितले.
दरम्यान, हिरव्या मिरचीला प्रति किलोला घाऊक बाजारात वीस रुपये भाव मिळाला. बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरल्याने शेतकरी, व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कार्तिकी एकादशीनंतर भावात मोठ्या प्रमाणात घसरत होते, असे व्यापारी अनिकेत बोराटे यांनी सांगितले.
सध्या स्थानिक परिसरातून अत्यल्प प्रमाणात भाजीपाला,फळभाज्या विक्रीला येत आहे. सध्या मध्य प्रदेशात हिरव्या वाटाण्याचा हंगाम सुरू झाला आहे.किरकोळ बाजारात मात्र हिरवा वाटाणा ८० ते १०० रुपये एका किलोने विकला जात आहे.
..................
04511