चाकणला बाबा महाराज यांच्या पालखीचे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकणला बाबा महाराज यांच्या पालखीचे स्वागत
चाकणला बाबा महाराज यांच्या पालखीचे स्वागत

चाकणला बाबा महाराज यांच्या पालखीचे स्वागत

sakal_logo
By

चाकण, ता. २३ : श्री क्षेत्र महाळुंगे (ता. खेड) येथील समर्थ सद्‌गुरू श्रीपती बाबा महाराज यांच्या पंढरपूरह आलेल्या पालखीचे चाकण येथे स्वागत करण्यात आले. ही पालखी कार्तिकी पंढरपूर येथे गेली होती. माणिक चौकातील हनुमान मंदिरात सोहळा विसावला. यावेळी आझाद हिंद मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वारकरण्यांचे स्वागत केले.

विठ्ठल रुखमाई देवस्थान यांचा पालखी सोहळा परंपरेनुसार दरवर्षी कार्तिकी वारीला पंढरपूरला जातो व तेथून पालखी आळंदीला येते. आळंदीला ज्ञानोबा माऊलींचा संजीवन समाधी सोहळा झाल्यानंतर श्रीपती बाबा महाराजांची पालखी श्री क्षेत्र महाळुंगे येथे कार्तिकी सोहळ्याला जाण्यासाठी निघते. या पालखी सोहळ्याला एकशे तेरा वर्षाची परंपरा आहे, अशी माहिती पालखी सोहळ्यातील खेड पंचायत समितीचे माजी सदस्य शिवाजी वर्पे यांनी दिली.

यावेळी झालेल्या आरतीच्या प्रसंगी खेड तालुका शिवसेनाप्रमुख रामदास धनवटे, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान पोखरकर, शिवाजी वर्पे, कृष्णा सोनवणे, दत्ता जाधव, अशोक जाधव, शशिकांत जाधव, दत्ता वाळके, शंकर महाळुंगकर, रामदास जाधव, संदेश जाधव, विनायक जाधव आदी व इतर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पालखी सोहळ्यातील प्रमुखांचा व वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. पालखी सोहळ्यासाठी कोकण, मुंबई तसेच परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविक वारकरी गर्दी करतात.
.......................................

04513