आळंदीत इंद्रायणीच्या पाण्यात पडलेल्या महिलेस जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदीत इंद्रायणीच्या पाण्यात पडलेल्या महिलेस जीवदान
आळंदीत इंद्रायणीच्या पाण्यात पडलेल्या महिलेस जीवदान

आळंदीत इंद्रायणीच्या पाण्यात पडलेल्या महिलेस जीवदान

sakal_logo
By

चाकण, ता. २३ : आळंदी (ता.खेड) येथील इंद्रायणी नदीच्या पाण्यात आज (ता.२३) दुपारी बारा वाजता पाय घसरून पडली. तिला आपत्ती निवारण यंत्रणेतील एनडीआरएफच्या जवानांनी त्वरित बाहेर काढून जीवदान दिले. वंदना रामचंद्र खोत (वय ४५, रा. खोतवाडी, ता. शिराळा, जि. सांगली, सध्या रा. मुंबई) असे तिचे नाव आहे. तिच्यावर सध्या आळंदी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. ऊर्मिला शिंदे यांनी सांगितले.

घटनेनंतर पोलिसांनी खोत यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. तिच्या मोबाईलवरून मुंबईतील मुलाशी संपर्क साधला आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन तिच्या प्रकृतीची चौकशी केली.
आळंदीनगर परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले की, तिला चक्कर आल्याने ती पाय घसरून पाण्यात पडली. महिलेची तब्येत स्थिर असून तिच्या नातेवाईकांशी संपर्क करण्यात आलेला आहे.