Mon, Jan 30, 2023

आम आदमी पार्टीकडून
चाकणला युवा संमेलन
आम आदमी पार्टीकडून चाकणला युवा संमेलन
Published on : 4 December 2022, 12:03 pm
चाकण, ता. ४ : खेड आळंदी विधानसभा अंतर्गत आम आदमी पार्टी युवा आघाडीकडून आप युवा संवाद संमेलन चाकण मार्केट यार्ड जवळील मीरा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते, अशी माहिती आप युवा आघाडीचे खेड तालुकाध्यक्ष मयूर दौंडकर यांनी दिली.
सामान्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी राजकारणाच्या व्यवस्था बदलून सकारात्मक बदल घडणे गरजेचे आहे. हा हेतू डोळ्यासमोर ठेऊन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनासाठी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष रंगा राचुरे, आप युवा आघाडीचे अध्यक्ष अजिंक्य शिंदे, आप पुणे जिल्हा उपाध्यक्ष व राज्य संघटक संदीप सोनवणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
-------------------------