चाकणच्या बाजारात पंजाबचा वाटाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकणच्या बाजारात पंजाबचा वाटाणा
चाकणच्या बाजारात पंजाबचा वाटाणा

चाकणच्या बाजारात पंजाबचा वाटाणा

sakal_logo
By

चाकण, ता.५ : येथील (ता. खेड) महात्मा फुले बाजारात पंजाब राज्यातील अमृतसर येथून हिरव्या वाटाण्याची मोठी आवक रविवारी (ता. ५) झाली. वाटाण्याला घाऊक बाजारात प्रति किलोला ४० ते ४५ रुपये भाव मिळाला, अशी माहिती व्यापारी रवींद्र बोराटे, भानुदास बुट्टे यांनी दिली.
महात्मा फुले बाजारात सध्या परराज्यातून मोठ्या प्रमाणात फळभाज्यांची आवक होत आहे. यामध्ये सध्या पंजाब,अमृतसर,मध्यप्रदेशातून सुरू झालेल्या हिरव्या वाटाण्याची आवक आज झाली. हिरव्या वाटाण्याला प्रति किलोला घाऊक बाजार ४० ते ४५ रुपये किलोला भाव मिळाला. हा वाटाणा चांगल्या प्रतीचा आहे.बाजारात सध्या टोमॅटोचे भाव घसरले आहेत. टोमॅटोला आज घाऊक बाजारात प्रति किलोला दहा रुपये भाव मिळाला.टोमॅटोच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे, अशी माहिती कुमार गोरे,आबा गोरे यांनी दिली.
हिरव्या मिरचीचे भाव मोठ्या प्रमाणात घसरल्याने शेतकरी, व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कार्तिकी एकादशीनंतर भावात मोठ्या प्रमाणात घसरत होते असे व्यापारी अनिकेत बोराटे यांनी सांगितले. सध्या स्थानिक परिसरातून अत्यल्प प्रमाणात भाजीपाला,फळभाज्या विक्रीला येत आहे. पण राज्यातून मोठ्या प्रमाणात फळभाज्या विक्रीस येत आहे. पंजाब,मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात हिरवा वाटाणा पुढील काळात विक्रीसाठी येणार आहे. सध्या पंजाब,मध्य प्रदेशात हिरव्या वाटाण्याचा हंगाम सुरू झाला आहे.किरकोळ बाजारात मात्र हिरवा वाटाणा ५० ते ६० रुपये एका किलोने विकला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे.
....................................
04584