Thur, Feb 9, 2023

चिंचोशीतील दोघांवर
मारहाणप्रकरणी गुन्हा
चिंचोशीतील दोघांवर मारहाणप्रकरणी गुन्हा
Published on : 12 December 2022, 3:18 am
चाकण, ता. १२ : चिंचोशी-गोकुळेवाडी (ता. खेड) येथे शेतात बाचाबाची होऊन ‘ट्रॅक्टर का अडवला’ असा जाब विचारल्यानंतर दोघांनी एकाला हाताने मारहाण करून दुखापत केली. तसेच, जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विष्णू पोपट गोकुळे (वय ४४) यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी संजय किसन गोकुळे, ज्ञानेश्वर संजय गोकुळे (दोघेही रा. चिंचोशी-गोकुळेवाडी) या दोघांवर मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली.