महाळुंगे येथील एकाची ऑनलाइन फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाळुंगे येथील एकाची 
ऑनलाइन फसवणूक
महाळुंगे येथील एकाची ऑनलाइन फसवणूक

महाळुंगे येथील एकाची ऑनलाइन फसवणूक

sakal_logo
By

चाकण, ता. १४ : महाळुंगे (ता. खेड) येथील एकाची दोन लाख ४२६ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली. हा प्रकार ३० ऑगस्ट २०२२ रोजी घडला. याप्रकरणी मंगळवारी (ता. १३) पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची फिर्याद धर्मेंद्रकुमार जगदीशप्रसाद शर्मा (वय ४९, रा. महाळुंगे, ता. खेड) यांनी दिली.
त्यांची ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये ५७ हजार रुपयांची फसवणूक झाली होती. याबाबतची तक्रार घेण्यासाठी व सदरची रक्कम परत करण्याचे बहाण्याने त्यांच्याकडून सर्व बॅंक डिटेल प्राप्त करून त्यांचे अकाउंट हॅक करून दुसरे अकाउंट रजिस्टर करून बँक खात्यातील दोन लाख ४२६ रुपये ट्रान्स्फर करून ऑनलाइन फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात आरोपीवर फसवणुकीचा व माहिती तंत्रज्ञान कायदा सुधारणा कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती महाळुंगे पोलिस चौकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे व पोलिस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिली.