चाकण येथील पोलिसाला लाच घेतल्याप्रकरणी अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकण येथील पोलिसाला लाच घेतल्याप्रकरणी अटक
चाकण येथील पोलिसाला लाच घेतल्याप्रकरणी अटक

चाकण येथील पोलिसाला लाच घेतल्याप्रकरणी अटक

sakal_logo
By

चाकण, ता. १९ : येथील (ता. खेड) पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई संतोष सुरेश पंदरकर याला दहा हजार रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला व अटक केली. तसेच इसम किसन आंद्रे याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त श्रीहरी पाटील यांनी दिली.
चाकण पोलिस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये आरोपी न करण्यासाठी ३२ वर्षीय तक्रारदार यांच्याकडे पोलिस शिपाई, लोकसेवक असलेल्या पंदरकर याने व किसन आंद्रे (रा. पाळू, पाईट, ता.खेड) यांनी दहा हजार रुपयांची लाचेची मागणी केली. त्यामुळे पोलिस शिपाई पंदरकर व आंद्रे यांच्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस शिपाई पंदरकर हे चाकण पोलिस ठाणे अंतर्गत पाईट पोलिस दूरक्षेत्र येथे कार्यरत होते.