चाकण परिसराला गुन्हेगारीचा विळखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकण परिसराला गुन्हेगारीचा विळखा
चाकण परिसराला गुन्हेगारीचा विळखा

चाकण परिसराला गुन्हेगारीचा विळखा

sakal_logo
By

चाकण ता. २५ : येथील (ता. खेड) औद्योगिक वसाहतीत तसेच चाकण, महाळुंगे परिसरात गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. यामुळे चाकण शहराच्या मध्यवर्ती भागातही निर्घृणपणे खून होतो. यामुळे नागरिकांमध्ये दहशत व भीती निर्माण पसरले आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्हेगारीच्या विळख्यातून सर्वसामान्यांना सोडविण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाईची मागणी होत आहे.

अल्पवयीन मुलांची वाढती गुन्हेगारी पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचे या परिस्थितीकडे दुर्लक्ष होते आहे का? असाही नागरिकांचा, व्यावसायिकांचा, उद्योजकांचा सवाल आहे.
चाकण, महाळुंगे परिसर दिवसाढवळ्या, रात्रीच्या वेळी वर्दळीच्या ठिकाणी खून होत आहेत. अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खंडणी, अपहरण, हप्ते मागणे, धमकी, हाणामारी असे प्रकारे वाढले आहेत. हे प्रकार वाढल्याने नागरिक, कामगार, उद्योजक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चाकण, महाळुंगे परिसरात ठेकेदारीवरून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तसेच खंडणीचे प्रकार वाढलेले आहेत. यामध्ये काही राजकीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांचाही छुपा सहभाग आहे हे वास्तव आहे.


चाकण, महाळुंगे परिसरात अवैध धंदे वाढत आहेत. गांजा विक्री केली जात आहे. इझी मनी मिळविण्यासाठी जो तो धडपडतो आहे.अल्पवयीन मुले गांजाचे सेवन मोठ्या प्रमाणात करून गुन्हेगारी करत आहेत असेही भयानक वास्तव आहे. जे कामगार, इतर लोक प्लॉट घेऊन घरांची कामे करतात त्यांच्याकडून खंडणी, हप्ता मागण्याच्या टोळ्या कार्यरत आहेत. खंडणी, हप्ता दिला नाही तर त्यांना हाणामारी, दमदाटी होते आहे असे प्रकार घडत आहेत. पोलिसात तक्रार कराल तर बघून घेऊ अशाही धमक्या दिल्या जातात. त्यामुळे पोलिसात तक्रार करणाऱ्यांचे प्रमाण फारच कमी आहे.

अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी वाढली आहे. यातून खुनाचे प्रकार घडत आहेत . या परिस्थितीवर पोलिसांचे अजिबात लक्ष नाही. त्यामुळे कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. चाकण, महाळुंगे परिसरातील कायदा सुव्यवस्थेबाबत पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहे.
- दिलीप मोहिते, आमदार