चाकण येथे बर्निंग टेम्पोला आग चाकण येथे बर्निंग टेम्पोला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकण येथे बर्निंग टेम्पोला आग 
चाकण येथे बर्निंग टेम्पोला आग
चाकण येथे बर्निंग टेम्पोला आग चाकण येथे बर्निंग टेम्पोला आग

चाकण येथे बर्निंग टेम्पोला आग चाकण येथे बर्निंग टेम्पोला आग

sakal_logo
By

चाकण, ता.२२ : पुणे-नाशिक महामार्गावरील तळेगाव चौकात शिक्रापूर (ता. खेड) बाजूकडे जाणाऱ्या बंद टेम्पोला आज (ता. २२) दुपारी अचानक आग लागली. लोखंडी बॉडी असलेल्या बंद टेम्पोमधून धूर येत होता. चौकात वर्दळीच्या रस्त्यावर असणाऱ्या पोलिसांनी व अधिकाऱ्यांनी हे पाहिले आणि टेम्पो थांबवला. त्यानंतर आग विझविण्यात आली. यामुळे त्यामुळे जीवितहानी व आर्थिकहानी टळली.
बंद टेम्पोमध्ये घरगुती वापराचे साहित्य तसेच दोन पूर्णपणे भरलेले गॅस सिलिंडर होते. जर पूर्णपणे पेट घेतला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. आग विझवल्याने जीवित हानी टळली, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर झोल यांनी दिली.
पोलिस हवालदार रामदास जायभाय हे इतर वाहनांवर कारवाई करत असताना शिक्रापूर बाजूकडे जाणारा टेम्पो पहिला. टेम्पोच्या बंद लोखंडी बॉडी मधून धूर मोठ्या प्रमाणात येत होता. त्यावेळी त्यांनी धावपळ करून टेम्पो चालकाला टेम्पो थांबविण्यास सांगितले. टेम्पो हा बंद बॉडी असलेला तळेगाव कडून शिक्रापूर बाजूकडे जात असताना त्याच्या मागील बाजूने धूर निघताना दिसला. त्यानंतर पोलिस हवालदार जायभाय, पोलिस उपनिरीक्षक झोल, पोलिस नाईक अमोल गव्हाणे यांनी टेम्पोत काय सामान आहे. याची चालकाकडे विचारपूस केली असता त्याने गाडीत दोन गॅसचे सिलिंडर, पँकिंग प्लास्टिक मटेरिअल, बॅटऱ्या व घरगुती साहित्य असल्याचे सांगितले.

04719