चाकणला आजपासून भरणार जनावरांचा बाजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकणला आजपासून भरणार जनावरांचा बाजार
चाकणला आजपासून भरणार जनावरांचा बाजार

चाकणला आजपासून भरणार जनावरांचा बाजार

sakal_logo
By

चाकण, ता. ३० : येथील महात्मा फुले बाजारात दर शनिवारी भरणारा जनावरांचा आठवडे बाजार लम्पीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या सहा महिन्यापासून जनावरांचा आठवडे बाजार बंद होता. परंतु, जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशानुसार चाकण येथील जनावरांचा बाजार (गाय, बैल, म्हैस व रेडे) जनावरांचा बाजार पुन्हा उद्या शनिवारपासून (ता. ३१) नियमित सुरू होणार आहे, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.
चाकण (ता. खेड) येथील महात्मा फुले बाजारातील जनावरांचा बाजार नियमित सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी या बाजारात जनावरे विक्रीकरिता आणावीत. जनावरे विक्रीस आणल्यानंतर लम्पी या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून जनावरे विक्रीसाठी आणावीत, असे आवाहन खेड कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. बाजारात जनावरे आणताना ती निरोगी असल्याची खात्री करूनच आणावीत. जनावरांना लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण केलेले असावे, कानात टॅग नंबर बिल्ला आसावा, विहित नमुन्यातील आरोग्य दाखला व वाहतूक प्रमाणपत्र सोबत असणे गरजेचे आहे, असे बाजार समितीचे प्रशासक हरिश्चंद्र कांबळे व बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सांगितले.