चाकणला हिरव्या मिरचीची तीस टन आवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकणला हिरव्या मिरचीची तीस टन आवक
चाकणला हिरव्या मिरचीची तीस टन आवक

चाकणला हिरव्या मिरचीची तीस टन आवक

sakal_logo
By

चाकण, ता. ३१ : येथील (ता. खेड) महात्मा फुले बाजारात आज (ता.३१) कर्नाटक राज्यातून तसेच नागपूरहून हिरव्या मिरचीची सुमारे तीस टनावर आवक झाली.मिरचीला बाजारात २५ ते ३० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाला.
चाकण बाजारात कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान, दिल्ली, सिमला या भागातून फळभाज्यांची आवक सातत्याने होत आहे. सध्या हिरवी मिरची ही कर्नाटक राज्यातून तसेच नागपूर येथून मोठ्या प्रमाणात विक्रीस येत आहे. हिरव्या मिरचीला मोठी मागणी आहे. हिरव्या मिरचीचे भाव वाढत आहेत, असे व्यापारी रवींद्र बोराटे, कुमार गोरे, चांगदेव बोराटे, आबा गोरे, ज्योतिबा गोरे, भानुदास बुट्टे, सुनील वहिले यांनी सांगितले. चाकण बाजारात पिंपरी चिंचवड, कोकण तसेच जिल्ह्यातून किरकोळ विक्रेते फळभाज्या खरेदी करण्यासाठी येतात.

मध्यप्रदेशातून वाटाण्याची सुमारे साठ टन आवक झाली. वाटाण्याला २० ते २२ रुपये एका किलोला भाव मिळाला. राजस्थान राज्यातून जोधपुरी गाजराची सुमारे चाळीस टन आवक झाली. गाजराला घाऊक बाजारात प्रति किलोला पंधरा रुपये भाव मिळाला, असे व्यापारी रवींद्र बोराटे, आबा गोरे, चांगदेव बोराटे, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.

घाऊक बाजारात वांगी,भेंडी, गवार, पावटा, तुरमुड्या वाल यांचे भाव प्रति किलोला साठ ते ऐंशी रुपये आहेत. किरकोळ बाजारात या फळभाज्या ८० ते १०० रुपये प्रति किलोंनी विकल्या जात आहेत. हिरवी मिरची ही किरकोळ बाजारात पन्नास ते साठ रुपये प्रति किलोने विकली जात आहे. या भाव वाढीचा फटका सर्व सामान्य ग्राहकाला बसला आहे. टोमॅटोचे भाव बाजारात प्रति किलोला आठ ते दहा रुपये आहेत.


04769