Sun, Jan 29, 2023

अकरा वर्षाच्या मुलीचे
नाणेकरवाडीत अपहरण
अकरा वर्षाच्या मुलीचे नाणेकरवाडीत अपहरण
Published on : 31 December 2022, 3:21 am
चाकण, ता. ३१ : नाणेकरवाडी (ता. खेड) येथे एका अकरा वर्षाच्या मुलीचे तिच्या घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन राहत्या घरातून अपहरण केले. याप्रकरणी पोलिसांत मुलीच्या आईने फिर्याद दिल्यानंतर आरोपी बाळू भोसले (वय ५०), राजा भोसले (वय ६०), सोनू (वय ४०; सर्व रा. बिडेवस्ती- नाणेकरवाडी) या तिघांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलिस निरीक्षक अनिल देवडे यांनी दिली. हा प्रकार ५ डिसेंबरला सायंकाळी सातच्या सुमारास घडला, असे फिर्यादीत म्हटले आहे. मात्र, ३० डिसेंबर गुन्हा दाखल केला.