वाकी खुर्दला नदीत मुलाचा बुडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाकी खुर्दला नदीत
मुलाचा बुडून मृत्यू
वाकी खुर्दला नदीत मुलाचा बुडून मृत्यू

वाकी खुर्दला नदीत मुलाचा बुडून मृत्यू

sakal_logo
By

चाकण, ता. १२ : वाकी खुर्द (ता. खेड) येथे भामा नदीच्या पाण्यात बुडून एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. अंशू रमेश गिरी (वय १६, रा. चाकण, ता. खेड), असे त्याचे नाव आहे. त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगलेल्या अवस्थेत आढळला. दुपारी दोनच्या सुमारास मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.
तो गेल्या दोन दिवसापासून तो बेपत्ता होता. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली होती. त्याच्या मृत्यूची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद पोलिस दप्तरी केली आहे. राजगुरुनगर येथील महाविद्यालयात अकरावी इयत्तेत तो शिकत होता. त्याच्या पाठीमागे आई, वडील, एक लहान भाऊ, असा परिवार आहे, अशी माहिती पोलिस ठाण्याचे हवालदार सचिन निघोट यांनी दिली.