कडाचीवाडी अपघातात रासे येथील मुलीचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कडाचीवाडी अपघातात 
रासे येथील मुलीचा मृत्यू
कडाचीवाडी अपघातात रासे येथील मुलीचा मृत्यू

कडाचीवाडी अपघातात रासे येथील मुलीचा मृत्यू

sakal_logo
By

चाकण, ता. १९ : चाकण-शिक्रापूर मार्गावर कडाचीवाडी (ता. खेड) येथे कडाचीवाडी फाट्यावर गुरुवारी (ता. १९) सायंकाळी साडेचारच्या सुमारास कंटेनरची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील तेरा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. भैरवी योगेश चौधरी (रा. रासे, ता. खेड) असे तिचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश चौधर हे दुचाकीवरून पत्नी व मुलगी भैरवी यांच्यासह रासे येथे चालले होते. चाकण बाजूकडून पाठीमागून आलेल्या कंटेनरची त्यांच्या दुचाकीला जोराची धडक बसली. त्यामुळे भैरवी रस्त्यावर फेकली गेली आणि तिच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेले. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. चौधरी यांची ती एकुलती एक मुलगी होती. याप्रकरणी कंटेनर चालक सुखविंदर रामकुमार कहार (वय ३१, रा. मुंबई) याला अटक केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश राठोड यांनी दिली.